

संशयितांच्या अटकेसाठी
महामोर्चाची घोषणा
पूर्णेकर हत्याप्रकरण : आंदोलन तीव्र करणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : शिवसेनेचे (यूबीटी) प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील तपास आणि अटकेच्या कारवाईवरून आता आंदोलनाची धग पाच सागरी जिल्ह्यांत पोहोचली आहे. हत्येला दीड महिना उलटूनही संशयितांना अटक झाली नसल्याने सागरी भूमिपुत्र महासंघाने सरकारविरोधात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेच्या मागणीसाठी ठाण्यात महामोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. मोर्चानंतरही कारवाई न झाल्यास अटकेपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
शनिवारी (ता. १४) ठाणे कोळी समाज सभागृहात पाच सागरी जिल्ह्यांतील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी आणि भंडारी समाजातील प्रतिनिधींनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका मांडली. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येच्या कटात सहभागाचा आरोप केला आहे. यासंदर्भातील पुरावे पोलिसांना दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.