esakal | पुणे जिल्ह्यातील ५० हजार शेतकरी वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यातील ५० हजार शेतकरी वंचित

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत ‘चौदा कोटींवर डल्ला’ असे वृत्त मंगळवारी ‘सकाळ’ने प्रकाशित  केले; त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी जिल्ह्यातील पाच लाख २० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील ५० हजार शेतकरी वंचित

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हजारो बोगस लाभार्थ्यांनी गेल्या पावणेदोन वर्षांत बिनबोभाट लाभ घेतला आहे. असे असताना पुणे जिल्ह्यातील ५० हजार शेतकरी विविध कारणांमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत ‘चौदा कोटींवर डल्ला’ असे वृत्त मंगळवारी ‘सकाळ’ने प्रकाशित  केले; त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी जिल्ह्यातील पाच लाख २० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १६ हजारांहून अधिक नागरिकांनी निकषात बसत नसतानाही या योजनेंतर्गत दरवर्षी  सहा हजार रुपयांचे अनुदान घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित अपात्र लाभार्थ्यांकडून ही रक्‍कम वसूल करणार असल्याचे सांगितले. ही रक्‍कम तातडीने न भरल्यास प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र,  नेमकी काय कारवाई करणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हेल्पलाइन ः ०११-२४३००६०६

अर्ज रद्द झाल्यास घरबसल्या दुरुस्ती 
पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतो. पूर्वी भरलेल्या अर्जात काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करता येतात. त्यासाठी https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. आधार संलग्न चुकीची माहिती दुरुस्त करता येते. नवीन शेतकरी नोंदणी, लाभार्थी सद्यःस्थिती आणि त्यांची तालुका, गावनिहाय यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लासुर्णे (ता. इंदापूर) येथील तलाठी सर्कलकडे दीड वर्षापूर्वी या योजनेसाठी अर्ज भरून दिला होता; परंतु लाभ मिळालेला नाही. याबाबत विचारणा केल्यास मुदत संपली असून, पुन्हा अर्ज घेतो, असे तलाठ्याने सांगितले. तहसीलदाराकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. 
- लक्ष्मण नामदेव पवार, शेतकरी, बेलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे