
पुणे : प्रहार दिव्यांग संघटनेकडून बदली पात्र शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. कार्यालयात शिक्षणाधिकारी आम्हाला भेटत नसल्याचे कारण देत कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयातून बाहेर आणून जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.