प्रहार चित्रपटाचे सोलापुरात विशेष प्रदर्शन

प्रहार चित्रपटाचे सोलापुरात विशेष प्रदर्शन
Published on: 

PNE26W59767
फोटोओळ :
सोलापूर : ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, महापौर विनायक कोंड्याल, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, प्रथमेश कोठे, रोहिणी तडवळकर आणि रामभाऊ जगदाळे.

‘प्रहार’ चित्रपटाचे सोलापुरात विशेष प्रदर्शन
डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांचा पुढाकार; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यायालयीन लढ्याची कहाणी मांडणाऱ्या ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाचे सोलापुरात मोफत विशेष प्रदर्शन करण्यात आले. सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकाराने वकील, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला कायदेशीर प्रक्रियेतून शिक्षा मिळवून देण्यासाठी निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा हा न्यायालयीन संघर्ष चित्रपटातून मांडण्यात आला आहे. दहशतवादाविरोधातील लढा, पुराव्यांचे महत्त्व, संविधानाच्या चौकटीत न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच निकम यांच्या कौटुंबिक आयुष्यातील भावनिक पैलूही चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक प्रथमेश कोठे आणि उद्योजक रामभाऊ जगदाळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com