CA Exam : भांबर्डे येथील प्रज्वल वायकर पहिल्याच प्रयत्नात झाला सीए

नातवाने साकारले दिवंगत आजोबांचे स्वप्न
Prajwal Waikar
Prajwal Waikarsakal
Updated on

पौड - भांबर्डे (ता. मुळशी) येथील प्रज्वल मोहन वायकर हा पहिल्याच प्रयत्नात ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण झाला. कुठलीही शिकवणी न लावता मोबाईल, समाज माध्यमांपासून दूर राहत, अभ्यासात सातत्य ठेवून त्याने चिकाटीने हे यश मिळवीत दिवंगत आजोबा, भांबर्डेचे माजी सरपंच विठ्ठल चिंतामण वायकर व बबन वायकर यांचे स्वप्न पूर्ण केले. मुळशी धरण भागात ‘सीए’ होण्याचा पहिला मान मिळवीत आजोबांची स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करणाऱ्या या नातवाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com