भारतीय सैन्यदलात पुण्याचा प्रकल्प टेके लेफ्टनंट पदी रुजू      

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

औंध(पुणे) : उत्तराखंडमधील डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ नुकताच पार पडला. मित्र राष्ट्रासह  देशातील विविध भागातील साडे-तीनशेहुन अधिक तरुण यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून अधिकारी पदावर देश सेवेत रुजू झाले आहेत. यातच पुण्यातील औंध येथील लेफ्टनंट प्रकल्प टेकेचाही समावेश आहे.

औंध(पुणे) : उत्तराखंडमधील डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या १४७ व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ नुकताच पार पडला. मित्र राष्ट्रासह  देशातील विविध भागातील साडे-तीनशेहुन अधिक तरुण यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून अधिकारी पदावर देश सेवेत रुजू झाले आहेत. यातच पुण्यातील औंध येथील लेफ्टनंट प्रकल्प टेकेचाही समावेश आहे.

घरात लष्कराची कोणतीही पार्शवभूमी नसताना लहानपणीच लष्करात अधिकारी होऊन देशसेवेचे स्वप्न त्याने पहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. दैनंदिन अभ्यास, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, बास्केटबॉल, एनसीसी या सर्वांमधून स्वतःचे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व तयार केले.           
                             
जुन्नरच्या आजींची कमाल! वयाच्या ७२ वर्षी 2 दिवसात 2 किल्ले केले सर 

औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्णकरून पहिल्याच प्रयत्नात नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए), खडकवासला येथे प्रवेश मिळवून तेथील तीन वर्षे व इंडियन मिलिटरी अकॅडमी, (आयएमए) डेहराडून येथे पुढील एक वर्ष अशी एकूण चार वर्षे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण करून प्रकल्प लेफ्टनंट या पदावर रुजू झाला आहे. दोन्ही अकॅडमीमध्ये त्याने सर्व प्रशिक्षणात विशेष प्राविण्य मिळविल्याने त्याची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. आर्मी सर्व्हिस कोर्प (ASC) ही त्याने प्रथम क्रमांकाने मिळविल्याने त्याला स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सध्या त्याची नियुक्ती अरुणाचल प्रदेशात भारत - चीन सीमेवर झालेली आहे.

भारतीय लष्करात देशसेवेसाठी दाखल झालेल्या सर्व नवअधिकाऱ्यांच्या अभिमानी पालकांना 'मेरी संतान देश को समर्पित' असे गौरव पदक भारत सरकारतर्फे देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रकल्पची आई योजना टेके या पुणे महापालिकेतील  शाळेत शिक्षिका असून वडील राज्य सरकारच्या सेवेत अधिकारी आहेत. या कुटुंबाला आपला एकुलता एक  मुलगा भारतीय लष्करात अधिकारी झाल्याचा रास्त अभिमान आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रकल्प याच्यावर लहानपणीच सनी देवोलची प्रमुख भूमिका असलेल्या बॉर्डर चित्रपटातील मेजर कुलदीपसिंग या पात्राची त्याच्यावर छाप पडली होती त्यामुळे त्याने  सैन्यात  दाखल होण्याचे स्वप्न पाहिले होते. "माझ्या बरोबर पुण्यासह राज्यातील इतरही तरुण लष्करात सैन्य अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत तथापि ही संख्या अत्यंत अल्प आहे. तरुणांनी व पालकांनी इतर क्षेत्राबरोबरच लष्करात अधिकारी  होण्याची स्वप्ने पाहावीत व देशसेवेत यावे. या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून तरुणांना करियरसाठी नक्कीच चांगले आहे." असे यावेळी प्रकल्प टेके म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakalp take from Pune is joining Indian Army as a lieutenant