
Prakash Abitkar
Sakal
पुणे : राज्यात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज आहे. पूरग्रस्त नागरिकांना आरोग्य सेवा द्यावी, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केली आहे. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे आदेश त्यांनी दिले.