"Prakash Ambedkar Appeals to Dhangar Community: Lead the OBCs to Power"
Sakal
पुणे
Prakash Ambedkar : धनगर समाजाने ‘ओबीसी’चे नेतृत्व करावे; सकल धनगर समाजाच्या अधिवेशनात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
OBC- Dhangar Community : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी धनगर समाजाला होळकरांची शिकवण अंगीकारत ओबीसी समाजाचे नेतृत्व करून आगामी निवडणुकांत सत्ता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.
पुणे : धनगर समाज लढवय्या असून, इतिहासात त्यांची नोंद राज्यकर्ता अशी आहे. समाजाने आपला इतिहास समजून घेत होळकरांनी दिलेली शिकवण अंगीकारत व लढवय्यापणा दाखवत समाजाची सामाजिक आणि राजकीय ओळख प्रस्थापित करायला हवी. आगामी निवडणुकांत ‘ओबीसीं’ची सत्ता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी धनगर समाजाने सर्व ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले

