esakal | प्रकाश आंबेडकरांच्या 'एक राजा बिनडोक' विधानावरून वाद; सुरेश पाटील यांच्याकडून निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

prakash ambedkar statement condemn by maratha leader suresh patil

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेवर टीका करताना, 'संभाजीराजे इतर मुद्द्यांकडे लक्ष वळवत आहेत', असे मत व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकरांच्या 'एक राजा बिनडोक' विधानावरून वाद; सुरेश पाटील यांच्याकडून निषेध

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : मराठा आरक्षणासाठी येत्या 10 ऑक्टोबरला राज्यात कडकडीत बंद पुकारण्यात येत आहे. त्या बंदला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केलाय. हा पाठिंबा जाहीर करताना, आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. या टीकेचा मराठा आरक्षण संघर्ष समितीकडून निषेध करण्यात आलाय. 

प्रकाश आंबेडकरांचे मूळ वक्तव्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले ऍड. आंबेडकर
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेवर टीका करताना, 'संभाजीराजे इतर मुद्द्यांकडे लक्ष वळवत आहेत', असे मत व्यक्त केले. तसेच एक राजा बिनडोक आहे', अशी जहरी टीकाही केली होती. त्यावेळी त्यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. परंतु, त्यांच्या या विधानावरून, सोशल मीडियावर रान उठायला सुरुवात झाली होती. मराठा आरक्षण संघर्ष समितीने ऍड. आंबेडकर यांच्या विधानाचा निषेध केलाय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

समितीकडून निषेध
या संदर्भात मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी ऍड. आंबेडकर यांच्या विधानाचा निषेध केलाय. त्याचवेळी वंचित बहुनज आघाडीने बंदला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी स्वागतही केलंय. मराठा समाजातील सर्व नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असं मतही सुरेश पाटील यांनी व्यक्त केलं.