मराठा आरक्षणासाठी बंदला पाठिंबा, पण एक राजा बिनडोक; प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

अ‍ॅड. आंबेडकर आज (दि.8) पुण्यात होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर स्पष्ट मते व्यक्त केली. खासदार छत्रपती संभाजीराजे हे आरक्षणापेक्षा इतर मुद्द्यांवर अधिक भर देत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

पुणे : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर भाष्य करताना आज, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक राजा बिनडोक असल्याची जहरी टीका केली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी आंबेडकर यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. लदरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या 10 तारखेला होणाऱ्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर कोणाला बिनडोक राजा म्हणाले, यावरून सद्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अ‍ॅड. आंबेडकर आज (दि.8) पुण्यात होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर स्पष्ट मते व्यक्त केली. खासदार छत्रपती संभाजीराजे हे आरक्षणापेक्षा इतर मुद्द्यांवर अधिक भर देत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबाबत काळजी घ्यायला हवी असेही ते म्हणाले. सुरेश पाटील यांनी आम्हाला पाठिंब्यासाठी संपर्क साधला, असल्याचे त्यांनी सांगितले.
 

महाराष्ट्राचे सामंजस्य बिघडू नये यासाठी बंदला पाठिंबा देत आहोत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आता गुन्हेगारांचं काही खरं नाही; पोलिस आयुक्तांनी केलाय मोठा निर्धार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash ambedkar support maratha aarakshan udayan raje bhosale