esakal | कोरेगाव भीमा : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मानवंदना
sakal

बोलून बातमी शोधा

perne.jpg

पेरणेफाटा (ता. हवेली) येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भेट देऊन अभिवादन केले.

कोरेगाव भीमा : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मानवंदना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा : पेरणेफाटा (ता. हवेली) येथे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भेट देऊन अभिवादन केले. यावेळी अनेक पदाधिकारी तसेच समता सैनिक दलाचे सदस्य त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभिनादनानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''विजयस्तंभास मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सरकारमधील सर्व घटकांनी त्यांचे योगदान व्यवस्थित दिले आहे. माझ्याकडे असणारी सर्व माहिती, तसेच ऑडीओ क्लीपसह तपशील घेऊन योग्य ती कार्यवाही केल्याने मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पडेल.'' 

दरम्यान, मानवंदनेसाठी येणारे सर्व नागरिक शांततेत येतील व जातील, अशी पोलिसांची व्यवस्था आहे. दरम्यान, कोरेगाव दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिस व पुणे शहर पोलिसांच्या तपासात एकवाक्यता दिसत नाही, मात्र दंगलीतील दोषींवर योग्य कारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image