सरकारने एल्गार परिषदेलाच लक्ष्य केले: प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

प्रकाश आंबेडकर म्हणाले, की लोक एकत्र आहेत. सरकारकडून आलेलं व्यक्तव्य चुकीचे आहे. गावकऱ्यांना तीन महिन्यांपूर्वी पोलिस स्टेशनला येऊन सांगितलेलं जे गेल्या वेळी घडलं, ते पुन्हा घडणार नाही. गावकऱ्यांचा मान सरकारने राखला पाहिजे होता, तो राखलेला नाही. मागच्यावेळी जे घडलं ते बाहेरच्या लोकांनी येऊन घडवलं. ज्यांना मागच्या वेळी येऊन घडवलं त्यांना नोटिसा दिल्या नाहीत.

पुणे : मराठा समाज आणि ओबीसी समाजात दंगली होऊ नयेत आणि समनव्यय राहावा, यासाठी प्रयत्न केले यांनाच नोटीसा दिल्या गेल्या. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. मुख्य आरोपी भिडेच, त्यांना नोटीस दिलेली नाही. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. ती दरी मिटवण्याचा प्रयत्न एल्गार परिषदेच्या माध्यमातून झाला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली गेली, असे भारीप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला आज (मंगळवार) प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम अभिवादन केले. सकाळी सात वाजताच येऊन त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. आंबेडकर यांची येेथे सभा घेण्याची प्रथा नाही. त्यामुळे त्यांची सभा होणार नाही. मात्र इतर पाच नेत्यांच्या या ठिकाणी सभा होणार आहेत. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे दाखल झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. तसेच प्रशासनानेही नागरी व्यवस्था पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, की लोक एकत्र आहेत. सरकारकडून आलेलं व्यक्तव्य चुकीचे आहे. गावकऱ्यांना तीन महिन्यांपूर्वी पोलिस स्टेशनला येऊन सांगितलेलं जे गेल्या वेळी घडलं, ते पुन्हा घडणार नाही. गावकऱ्यांचा मान सरकारने राखला पाहिजे होता, तो राखलेला नाही. मागच्यावेळी जे घडलं ते बाहेरच्या लोकांनी येऊन घडवलं. ज्यांना मागच्या वेळी येऊन घडवलं त्यांना नोटिसा दिल्या नाहीत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar visit Koregaon Bhima