
Pune Latest News: पुणे सायबर पोलीस ठाण्यात प्रांजल खेवलकरच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीनंतर नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खेवलकरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खेवलकर यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम 66E आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.