
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत खेवलकर यांच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी अटक झालेल्या खेवलकर यांच्या मोबाईल फोनमध्ये अश्लील व्हिडीओ, फोटो आढळून आले आहेत. यात मानवी तस्करीची शंकाही व्यक्त केली जात असल्याचं चाकणकर यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता नवी माहिती समोर येत आहे.