esakal | कोरोनाच्या तिस-या लाटेची तयारी; पण कंत्राटी मनुष्यबळावर मर्यादा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates

कोरोनाच्या तिस-या लाटेची तयारी; पण कंत्राटी मनुष्यबळावर मर्यादा

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : एकीकडे कोविडच्या तिस-या लाटेची (corona third wave) तयारी करण्यासाठी प्रशासन गुंतलेले असताना दुसरीकडे मात्र कंत्राटी मनुष्यबळावरच थेट मर्यादा आणल्याने हे संकट आलेच तर त्याला तोंड कसे द्यायचे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कोविडची दुसरी लाट आल्यानंतर खडबडून जागे होत राज्य सरकारने मार्च 2020 पासून सर्वच संस्था स्तरावर कोविडची साथ हाताळण्यासाठी मनुष्यबळाला मंजूरी दिली होती. मात्र केंद्र सरकारने या मनुष्यबळाला मंजूरी दिली नाही. त्या मुळे तिस-या लाटेच्या अनुषंगाने राज्यानेही आता नवीन निर्णय घेतला आहे.

या अंतर्गत कोविड उपचार केंद्रासाठी (डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी) नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा 31ऑगस्टपासून संपुष्टात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे मनुष्यबळासाठी निधीच मंजूर नसल्याने कंत्राटी कर्मचा-यांना देण्यात येणारा कोविड प्रोत्साहन भत्ता देखील 1 सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा: विराट, शास्त्री.. तुमचं गलिच्छ राजकारण थांबवा; नेटकरी संतापले

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मनुष्यबळ लेखाशीर्षकाअंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून विशेषतज्ज्ञांचे मानधन अदा करण्यात यावे, नियमित व राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिका-यांच्या सेवा कोविड उपचार केंद्र व कोविड केंद्रासाठी घेण्यात याव्यात, कोविड व्यतिरिक्त इतर काम कमी असल्याने सीएचओ, आयुष एमओ, ग्रुप बी- एमओ यांच्या सेवाही कोविड उपचार केंद्रांसाठी घेण्यात याव्यात, स्टोअर ऑफिसर व हॉस्पिटल मॅनेजरची पदे रद्द करावीत, कोविडचे रुग्ण वाढल्यास कोविड व्यतिरिक्त इतर सेवा देत असलेल्या रुग्णालयातील कर्मचा-यांची आवश्यकतेनुसार सेवा घेण्याचीही शिफारस आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ. एन. रामास्वामी यांनी एका परिपत्रकाद्वारे केलेली आहे.

अपु-या मनुष्यबळाअभावी अडचणी येणार...

तिसरी लाट आली तर कंत्राटी कर्मचारी नसल्याने उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा अतिरिक्त ताण येणार हे उघड आहे. पुणे जिल्ह्यात आरोग्य सेविकांची सोळा पदे रद्द करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जारी केला आहे. एकीकडे कोविडच्या तिस-या लाटेची तयारी करायची असताना दुसरीकडे मनुष्यबळच नसेल तर उपलब्ध मनुष्यबळात या लाटेला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न आरोग्य विभागाच्या कर्मचारी व अधिका-यांपुढे आहे. सध्या लसीकरण व स्वॅब तपासणी तसेच त्याच्या एन्ट्री करण्याच्या कामासह इतरही अतिरिक्त ताण सध्या यंत्रणेवर आहे.

हेही वाचा: तबलीगी प्रकरणात काही माध्यमांचे वार्तांकन धार्मिक रंग देणारे: SC

दोन वर्षे सलगपणे काम करुन आरोग्य विभागाची यंत्रणा दमलेली असल्याने त्यांच्यावरच आता सगळा ताण दिला तर यंत्रणा कोलमडून पडेल अशी भीती व्यक्त होत आहे. बारामतीसारख्या ठिकाणी आसपासच्या सहा तालुक्यातून रुग्ण येतात आणि अतिरिक्त ताण अधिक आहे, अशा वेळेस उपलब्ध मनुष्यबळात काम करणे अवघड होणार आहे.

loading image
go to top