'यांनी' रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट 

Prashant Bose and Rona Wilson planned for PM Modi assassination
Prashant Bose and Rona Wilson planned for PM Modi assassination
Updated on

पुणे : बंदी असलेल्या सीबीआय माओवादी या संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरो (ईआरबी) समितीचा सचिव केंद्रीय समिती सदस्य किशन दा उर्फ प्रशांत बोस आणि रोना विल्सन यांच्यासह संघटनेच्या इतर भूमिगत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट केल्याचे स्पष्ट झाल्याचे पुणे पोलिसांनी याप्रकरणात सादर केलेल्या दोषारोपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोप निश्चितीबाबत सादर करण्यात आलेल्या आराखड्यात देखील याचा उल्लेख आहे.

दोषारोपत्रात नावे असलेल्या आरोपींचा पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यात आणि लोकशाही शासन व्यवस्था व देशातील नागरिकांच्या विरोधात युद्ध पुकारण्यासाठी सीपीआय (एम) या संघटनेच्या व्यापक कट कारस्थानाचा भाग म्हणून व त्या उद्देशाने अवैध हत्यार व दारुगोळा मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासत निष्पन्न झाले आहे.

प्रशांत बोस यांच्यासोबत रोना विल्सन यांचे ईमेलद्वारे झालेले संभाषण पोलिसांना मिळाले होते. त्याबाबतचे एक पत्र देखील पोलिसांच्या हाती आले होते. माओवाद्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला होता. रोड शोच्या दरम्यान घातपात घडवून पंतप्रधान राजीव गांधीची ज्या पद्धतीने स्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. त्याच पद्धतीने घातपात घडवून आणण्याचा कट केल्याचा त्या पत्रात उल्लेख होता. मात्र आरोपींच्या वकिलांकडून हे सर्व पत्रे खोटी असल्याचा आरोप करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Residents of remote Khopadewadi village near Rajgad Fort were forced to perform a funeral under a tarpaulin in heavy rain due to the absence of a crematorium, highlighting the lack of basic infrastructure in the region.
Nirmala Nawale NCP appointment
Garbage bins overflowing near the entrance of Padmashri Dr. Manibhai Desai Arts and Commerce College in Uruli Kanchan have triggered concerns over hygiene and student safety, with residents questioning the Gram Panchayat's waste management.
JCBs and Poclains Ravage Pune Hills; Environmentalists Raise Alarm
Marathi News Esakal
www.esakal.com