esakal | कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती
sakal

बोलून बातमी शोधा

Koregaon Bhima suspects will be charged

एल्गार आणि भीमा - कोरेगाव प्रकरणातील 19 संशयित आरोपींवर उद्या (ता. 1) आरोप निश्चिती (चार्ज फ्रेम) होणार असून त्यानुसार त्यांच्या विरोधात खटला चालविला जाणार आहे. 

कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : एल्गार आणि भीमा - कोरेगाव प्रकरणातील 19 संशयित आरोपींवर उद्या (ता. 1) आरोप निश्चिती (चार्ज फ्रेम) होणार असून त्यानुसार त्यांच्या विरोधात खटला चालविला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संशयित 19 आरोपींपैकी नऊ जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यातील सर्व आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला आहे. तर उर्वरित दहा आरोपींपैकी काहींना न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे तर काही भूमिगत असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सुधीर ढवळे, सागर उर्फ सूर्या गोरखे, हर्षाली पोतदार, रमेश गाईचोर, दौला कामा डेंगळे उर्फ दिपक उर्फ प्रताप, ज्योती जगताप, रोना विल्सन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, कॉ. मिलिंद तेलतुंबडे, कॉ. प्रकाश उर्फ नवीन, कॉ. मंगलू, कॉ. दीपू किशन उर्फ प्रशांतो बोसे, अरुण फरेरा, वर्णन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, वरवर राव अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

संजय राऊत म्हणतात, सेनेच्या नेत्यांनी धीर धरावा, कारण...

संशयितांना पोलिसांकडून देण्यात आलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी आरोपींनी स्वतःचा इलेक्‍ट्रॉनिक तज्ज्ञ नेमावा. संबंधित तज्ज्ञाने क्‍लोन कॉपीबाबत सर्व तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना न्यायालयाने मागील तारखेला दिल्या आहेत. त्यामुळे  क्‍लोन कॉपीबाबत असलेला वाद आता संपला असून आरोपींवर कोणत्या कलमान्वये खटला चालवावा आराखडा नुकताच जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांच्या न्यायालयात सादर केला आहे. त्यानुसार एक जानेवारीपासून या खटल्याची सुनावणी होणार आहे.
वरवरा राव आणि रोना विल्सन यांच्यासह काही आरोपींविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा ( युएपीए) नुसार कोणतेही पुरावे नाहीत. त्याबाबतचा उल्लेख त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता मात्र सर्व विरोधक आरोपींच्या विरोधात युएपीए कायदा लावण्यात आला आहे.