

Veteran Actor Prashant Damle Presents 13,333th Performance
Sakal
पुणे : ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांचा वैयक्तिक विक्रमी १३,३३३ वा प्रयोग रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात सादर केला. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘हाऊसफुल्ल प्रशांत दामले महोत्सवा’ची सांगता या प्रयोगाने झाली. ‘पल्लोड’ने हा महोत्सव प्रस्तुत केला होता; तर ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ हे या महोत्सवाचे सहयोगी प्रायोजक होते. या प्रयोगावेळी दामले यांचा विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी शेलार बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रशांत दामले यांच्या पत्नी गौरी दामले, ‘पल्लोड’चे मालक सुरेश पल्लोड, रुपेश पल्लोड, ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’चे मुख्य आर्थिक व कार्यपालन अधिकारी आदित्य मोडक, ‘सकाळ’चे मुख्य विपणन अधिकारी रुपेश मुतालिक आदी उपस्थित होते.