पुण्यात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी अखेर प्रशांत जगताप यांची निवड

prashant jagtap
prashant jagtap

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केली. अध्यक्षपदाचे पत्र पवार यांनी जगताप सुपूर्त केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आता नव्या चेहऱ्याला शहराध्यक्षपदाची संधी दिली आहे. महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. त्याची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने शहरात खांदेपालट केला आहे.

prashant jagtap
माजी क्रिकेटरच्या किडनॅपिंगमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडचाच हात?

राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी चार दिवसांपूर्वी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या २१ वर्षांपासून पक्षसंघटनेत कार्यरत असलेल्या जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. जगताप २०१६ - १७ मध्ये पुण्याचे महापौर होते. त्यांच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटी आणि मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. या दोन्ही कार्यक्रमांच्या वेळी राज्यात भाजप- शिवसेना युतीची सत्ता होती. तर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी दोन्ही प्रकल्पांवरून वादंग झाला होता. महापौर म्हणून जगताप यांचा त्यावेळी भाजपबरोबर संघर्ष झाला होता. जगताप यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये ते निवडून आले आहेत. २०१२ मध्ये पीएमपीच्या संचालकपदाची त्यांना संधी मिळाली होती.

prashant jagtap
व्यापाऱ्यांना कर्जाचे हप्ते, टॅक्समध्ये निम्मी सवलत द्या

पुण्यातील वानवडी भागातून जगताप निवडून आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २००० मध्ये शहर सरचिटणीस, चिटणीस होते. त्यानंतर २००३ मध्ये तत्कालीन पीएमटीचे संचालक होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कोण होणार, या बाबत पक्षवर्तुळात कुतूहल होते. त्यासाठी अनेक नावे चर्चेत होती. जगताप आता त्यांची शहर कार्यकारिणी कधी तयार करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत जगताप आणि त्यांची आई रत्नप्रभा जगताप हे दोघेही एकाच प्रभागातून निवडून आले आहेत. अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यावर जगताप म्हणाले, ‘‘पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्या बद्दल खरोखरच आनंद होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची महापालिकेत सत्ता आणण्याचे माझे ध्येय्य असेल. भाजपच्या कारभाराला नागरिक कंटाळल्यामुळे महापालिकेत नक्कीच सत्ताबदल होणार आहे. त्यासाठी पक्षाची आता तयारी सुरू असेल.’’ पक्षाचे महापालिकेतील नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक जिंकून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

prashant jagtap
पुण्यात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी 'जुगाड ऍम्ब्युलन्स' संकल्पना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com