
NCP News: "इति श्री सुपारी किंग" म्हणत राष्ट्रवादीची राज ठाकरेंवर 'त्या' विधानावरून टीका
NCP on Raj Thackeray: रविवारी व्हीजेटीआय कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले होते की,कधीही जाति पातीच्या भानगडीत पडू नका.
मित्र-मैत्रीण करताना कधीही कोणाची जात पाहू नका, या जाति पातींन मधून काहीही हाताला लागणार नाही, आपण मराठी आणि हिंदू आहोत येवढ फक्त लक्षात ठेवा.
राज ठाकरेंच्या या सल्ल्यावर राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर टीका केली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की,"जातीपातीच्या भानगडीत पडू नका (थेट धर्माचं राजकारण करा)- इति श्री सुपारी किंग" असा आशय लिहीत टीका केली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकीमुळे राजकारण चांगलच तापलं आहे, मागील काही दिवसांपुर्वी देखील राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आणि मनसे शहर अध्यक्ष यांच्यामध्ये ट्विटर वॉर चालू होता.