

Pune Municipal Election Result
esakal
PMC Election Result: पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं नाराजी व्यक्त करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांचा विजय झालाय. या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं उघडलंय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानं त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून एकेकाळी त्यांच्यासोबत काम केलेल्या अभिजित शिवरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.