
हडपसर - तुम्ही कोठे आणि कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेता यापेक्षा कोणत्या ध्येयाने आणि किती जिद्दीने प्रयत्न करता, यावर तुमचे यशापयश अवलंबून असते. असे कर्तृत्व हडपसर येथील प्रशांत झटाल या विद्यार्थ्याने करून दाखविले आहे. त्याने पालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन जिद्दीने कष्ट करीत सैन्यदलात दाखल होण्यात यश मिळविले आहे. महानगरपालिकेच्या ज्या शाळेत तो शिकला त्या शाळेने या निमित्ताने त्याचा विशेष सन्मान केला आहे.