esakal | पर्यावरण संतुलनाचा संदेश देत हर्षवर्धन पाटील कुटुंबियांचे गौरीपूजन.
sakal

बोलून बातमी शोधा

gauri pujan

पर्यावरण संतुलनाचा संदेश देत हर्षवर्धन पाटील कुटुंबियांचे गौरीपूजन.

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबियांनी इंदापूर भाग्यश्री निवासस्थानी गौरी पूजनानिमित्त पर्यावरण संतुलनाचा संदेश देत पर्यावरणपूरक सजावटींसह आकर्षक देखावा साकारला. हळदी कुंकवाचे लेणं घेऊन गौरी आली... गौरी आली.. असे म्हणत गौरीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी गौराईची विधिवत पूजा करत कोरोना महामारी हटू दे, बळीराजास सुखी ठेव तसेच सर्वांचे जीवन सुजलाम सुफलाम होवू दे अशी प्रार्थना केली. इंदापूर तालुका जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता पाटील यांनी गौराईची पर्यावरणपूरक सजावट केली.

हेही वाचा: सातारा : यंदाही पालिकेतर्फे फिरते मुर्ती संकलन केंद्र

भाग्यश्री पाटील आणि अंकिता पाटील दरवर्षी मोठ्या उत्साहात गौराईची सजावट करीत असतात. गौराईसाठी विविधप्रतिकृतींचे सादरीकरण करत त्यांनी आपला आनंद द्वि गुणित केला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर अर्बनसहकारी बँकेचे अध्यक्ष देवराज पाटील, उपाध्यक्ष सत्यशील पाटील, इंदापूर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मेघश्याम पाटील, वाहतूक संघाचे अध्यक्ष रघुनाथ राऊत, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, हमीद आतार उपस्थित होते. स्वागत व सुत्रसंचलन निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले.

loading image
go to top