लॉकडाउनच्या काळातही टपाल सेवेला...

tap.jpg
tap.jpg
Updated on

पिंपरी : फेसबुक, व्हॉट्‌सऍप, एसएमएस, ई - मेल यांच्या जमान्यातही टपाल सेवेला पसंती मिळत आहे. या पत्रांमधील जिव्हाळा काही सोशल मीडिया, ई-मेलच्या माध्यमातून व्यक्त होत असला तरी विमा कंपन्यांच्या पावत्यांपासून नोटीसपर्यंत टपालखात्यावरच विसंबून राहावे लागते. परिणामी लॉकडाउनच्या काळात महिन्याला 20 हजार ग्राहकांना सेवा पोचली आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

मोबाइलच्या जमान्यातदेखील पोस्टाची सेवा केवळ पत्रांपुरती मर्यादित राहिली नाही. मनीऑर्डरदेखील स्वीकारण्यात येत आहे. स्पीड पोस्ट, वाढत्या ई-कॉमर्सच्या काळात टपाल खात्यानेही भरारी घेतली आहे. खासगी कुरिअर सेवा जिथे नाकारली जाते, तिथे टपाल सेवा मदतीला धावून येते. त्यामुळे कधीतरी थोडे अधिक पैसे भरूनही भारतीय नागरिक पार्सल पोहोचवण्यासाठी टपाल खात्यावर भार सोपवून मोकळे होत आहेत. नागरिकांच्या दारापर्यंत टपालसेवा पुरवणारी भारतीय टपाल सेवा ही जगभरातील एकमेव सेवा असल्यानेच ईमेलच्या काळात आजही पोस्टमनला त्या भागातील नागरिक थेट नावाने ओळखतात. "बिझनेस मेल' या संकल्पनेमुळेही एका ऑफिसमधील 800 जणांना पत्र पाठविण्यात येतात, असे दिवसाला 21 हजार "मेल' येत आहेत. 

संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून पूर्वी पोस्टकार्डाचा वापर केला जायचा. प्रिय व्यक्तींना, आप्तजनांना मनातील आनंद, दु:ख अशा मानवी भावना या पत्रांतूनच अभिव्यक्त होत असते. छोट्याशा पोस्टकार्डावरच माहिती, खुशाली, आनंदाची बातमी दिली जात होती. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ई-मेल, एसएमएस, फेसबुक, "व्हॉट्‌सऍपव्दारे क्षणात संदेश पोचवता येत आहे. त्यामुळे एकेकाळी संपर्कासाठी मदतीला येणारी पत्रे आता काही प्रमाणात कालबाह्य होत असली, अनेकांकडून आजही पोस्ट कार्ड पाठवली जात आहेत.

स्थानिक आमदार, नगरसेवक, कंपन्यांकडून, बॅंकांकडून आजही ग्राहकांना थेट पोस्ट कार्ड पाठवून शुभेच्छा दिल्या जाताहेत. आजही सरकारी नोकरीसाठी पाठवण्यात येणारे निवड झाल्याचे पत्र येत आहेत. तसेच सरकारी कागदपत्रांसह मुक्त विद्यापीठाची पुस्तके, एलआयसी कागदपत्रे, मनीऑर्डर, रजिस्टर पत्र, स्पीड पोस्ट यांचे वाटप जास्त करावे लागते. आजही वृत्तपत्रांमध्ये "वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरासाठी पत्र लेखी स्वरूपात येत आहेत. 

टपाल सेवा कालबाह्य झाली आहेत, असे म्हणता येणार नाही. आजही आमच्याकडे दिवसाला चार पत्रे येतात. आमच्या कामाचे स्वरूप बदलत असले, तरी कामाचा व्याप कायम आहे. -के. एस. पारखी, जनसंपर्क अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com