रेड झोनमधील शाळांसाठी स्वतंत्र नियमावली; पुण्यात अंमलबाजवणी 

टीम ई-सकाळ
Tuesday, 16 June 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली परिस्थिती लक्षात घेता राज्यातील कोणत्याही मंडळाच्या शाळांनी शुल्क वाढ करू नयेत, असे आदेश यापुर्वीच शिक्षण विभागाने दिले आहेत.

पुणे  : यंदाचे शैक्षणिक वर्षास सुरवात झाली असून राज्यातील शाळा जुलैपासून टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. आता रेड झोनमधील शाळांसाठी स्वतंत्र नियमावली असणार आहे. ही नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

आणखी वाचा - अजित पवारांनी, भाजपचा हिशेब केला चुकता

राज्य सरकारने यंदाचे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू केले असून, राज्यातील शाळांमार्फत ऑनलाईन वर्ग भरविण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्वतभूमीवर गायकवाड यांनी पत्रकारांशी ऑनलाईनद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी शुल्कवाढ, शुल्क कमी करणे, कोरोनाच्या पार्श्वपभूमीवर शाळांसाठी असणारी नियमावली अशा विविध विषयांवर चर्चा केली. त्या म्हणाल्या, ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली परिस्थिती लक्षात घेता राज्यातील कोणत्याही मंडळाच्या शाळांनी शुल्क वाढ करू नयेत, असे आदेश यापुर्वीच शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याप्रमाणे शाळांना कोणत्याही प्रकारचे शुल्क वाढविता येणार नाही. तसेच राज्यातील सीबीएसई, आयसीएसई अशा विविध मंडळांच्या शाळांमध्येही यंदा शुल्क वाढ करण्यात येऊ नये, यासंदर्भातील पत्र संबंधित मंडळांना दिले असून त्यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.'

आणखी वाचा - पवारसाहेबांच्या शेती शाळेत रमले, राजू शेट्टी

राज्यातील शाळांनी ऑनलाईन वर्ग भरविण्यास सुरवात केल्या आहेत. परिणामी प्रत्यक्ष शाळांमधील वीज बिल, शाळा व्यवस्थापन अशा विविध खर्चात मोठी बचत होत आहे. त्यामुळे शाळांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क कमी करावे, अशी मागणी पालक आणि विविध संघटनांमार्फत सातत्याने होत आहे. याबद्दल बोलताना गायकवाड म्हणाल्या, ‘सध्या राज्यातील शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केल्याने शाळेच्या खर्चात बचत होत आहे. त्यामुळे शाळांनी शुल्क 10 ते 20 टक्यांग   नी कमी करावे, अशी मागणी पालक करत आहेत. परंतु, शुल्क नियमन कायद्यानुसार शाळांचे शुल्क ठरविण्याचा आणि ते कमी करण्याचा अधिकार शाळेतील पालक-शिक्षक संघाला आहे. त्यामुळे शुल्क कमी करण्याचा निर्णय संबंधित शाळांमधील पालक-शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापनाने एकत्रितपणे घ्यावा.'

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या 

  • दहावीचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्याचा प्रयत्न
  • ऑनलाईन वर्ग भरविताना शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीचे पालन व्हावे
  • राज्यातील शाळांमध्ये शुल्कवाढ न करण्यासंदर्भात संबंधित सर्व मंडळांना पाठविले पत्र

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus red zone schools will have special guidelines