

Pune Pregnant Job Scam
ESakal
सोशल मीडियाच्या या झगमगाटीच्या जगात आजकाल विविध नोकऱ्यांचे घोटाळे फोफावत आहेत. पुण्यातील एका ४४ वर्षीय कंत्राटदाराची कहाणी खरोखरच भयावह आहे. बनावट जाहिरातीला बळी पडून त्याने लाखोंचे नुकसान केले. सोशल मीडियावरील जाहिरातीत एका महिलेने लिहिले होते, "मला असा पुरूष हवा आहे जो मला आई बनवू शकेल." महिलेने गर्भधारणा केल्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आश्वासन होते. पण प्रत्यक्षात तो एक सापळा होता. ज्यामुळे कंत्राटदाराचे ११ लाख रुपये गमवावे लागले. ही घटना वाचून तुम्हालाही हादरा बसेल.