swine flu vaccine
sakal
पुणे - गर्भवतींना स्वाइन फ्लूची बाधा होऊ नये, यासाठी देण्यात येणारी स्वाइन फ्लू विरोधी प्रतिबंधात्मक लस अद्याप राज्याच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला न मिळाल्याने शहरातील हजारो गर्भवतींचे लसीकरण खोळंबले आहे.
इतकेच नव्हे तर गर्भवतींबरोबरच मधुमेह, रक्तदाब अशा सहव्याधी असलेले रुग्ण आणि ६० वर्षांवरील नागरिकांनाही याची लस मोफत देण्यात येते. मात्र, लसच उपलब्ध नसल्याने सर्वाधिक जोखमीच्या गटांतील नागरिकांना आरोग्य संरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.