भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची तयारी: जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक,

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पुणे : हवेली तालुक्‍यातील पेरणे फाटा (भीमा कोरेगाव) येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी एक जानेवारी रोजी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्‍यक सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

पुणे : हवेली तालुक्‍यातील पेरणे फाटा (भीमा कोरेगाव) येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी एक जानेवारी रोजी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्‍यक सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप 

पेरणे येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक गुरुवारी (ता. 5) जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे आदी या वेळी उपस्थित होते.

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

विजयस्तंभाला भेट देणाऱ्या नागरिकांची आणि गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधितांनी उपाययोजना कराव्यात. टॅंकरद्वारे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, फिरते स्वच्छतागृह, ये-जा करण्याकरीता एस.टी. महामंडळ आणि पीएमपीएमएल यांनी पुरेशा बसेस उपलब्ध करुन द्याव्यात. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका आणि पुरेसा औषध साठा तयार ठेवावा. बांधकाम विभागाने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सीसीटीव्ही, प्रशस्त वाहन पार्किंग व्यवस्था करावी. विद्युत विभागाने पुरेसा विद्युतपुरवठा करावा. अन्न व औषध विभागाने खाद्यपदार्थांच्या दुकानामध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अग्निशमन दल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुविधा वेळेत उपलब्ध होण्यासाठी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

काय घडलं बैठकीत ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून कामे करावीत. या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. या बैठकीस महसूल, गृह विभागासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच वढू, पेरणे येथील सरपंच आणि नागरिक उपस्थित होते.

सिंचन प्रकल्पाचे 'ग्रहण' अजित पवारांच्या नाही तर, फडणवीसांच्या मागे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparation for Bhima Koregaon Vijay Stambh Greetings Program Review meeting of collectors