esakal | काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड
sakal

बोलून बातमी शोधा

Inside Story of Ajit Pawar Rebel against the party

२२ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एक बैठक झाली. या बैठकीत काही घडमोडी घडल्या आणि या बैठकीनंतर अजित पवारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

मुंबई : २२ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एक बैठक झाली. या बैठकीत काही घडमोडी घडल्या आणि या बैठकीनंतर अजित पवारांनी बंड करण्याचा निर्णय घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मुंबईत नेहरु सेंटर येथे ही बैठक झाली होती. बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकासआघाडीचे काही महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाद झाला असल्याचे सांगण्यात येते. शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेसला अध्यक्षपद देण्यासंदर्भात कबूल केलं होतं. बैठकीत अहमद पटेल यांनी हाच मुद्दा पुन्हा काढला. तोच मुद्दा अहमद पटेल परत परत काढत असल्याचे शरद पवार यांना वाटले. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी आवाज चढवून हा मुद्दा पुन्हा रेटण्याचा प्रयत्न केला.

सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक!

खरगे जाब विचारण्याच्या आवाजात बोलत असल्याची समजूत पवार यांची झाली. पवार यावरून संतापले. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. या सर्वांसमोर आपला अपमान झाला असल्याची जाणीव पवारांना झाली आणि पवार लगेच खुर्चीवरून ताडकन उठले आणि बैठकीतून थेट बाहेर पडले. मला ही युती करायची नाही, आपले मार्ग आता वेगवेगळे असल्याचेही यावेळी शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांना ठणकावून सांगितले.

भाजपच्या 'या' उमेदवारासाठी घेतली सर्वच पक्षांनी माघार

अजित पवार हेही यावेळी बैठकीला उपस्थित होते. अजित पवार याच घटनेमुळे काँग्रेसवर संतापले. पवारांनी त्याचवेळेस महाराष्ट्र विकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांच्या मर्जीनुसार त्यांना भाजपसोबत जाण्याची ही एक चालून आलेली संधी होती. त्यांनी ही संधी साध्यण्याचा निर्णय घेतला आणि २२ आणि २३ नोव्हेंबरच्या रात्री महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी बंड केल्याच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. परंतु, २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीतील घडामोडींमुळेच खरंतर अजित पवार यांच्यामध्ये बंड करण्याची हिंमत आली होती.

दरम्यान, नुकतीच शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी माझा मुंबईतील नेहरू सेंटर येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांसोबत वाद झाला आणि मी बैठकीतून बाहेर पडलो असे सांगितले. त्यामुळे सूत्रांच्या या माहितीला पुष्टी मिळत आहे.