esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

katraj

अंबामाता मंदिराच्या ट्रस्टकडून नवरात्रोत्सवाची तयारी

sakal_logo
By
अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : सुखसागरनगरमधील अंबामाता मंदिर येथील अंबामाता ट्रस्टच्या वतीने यावर्षी कोरोना नियमांचे पालन करून नवरात्रोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. धनराज राठी यांनी १९८३मध्ये अंबामाता मंदिर ट्रस्टची स्थापना केली. ट्रस्टने गेल्या २८ वर्षांपासून परंपरा, पूजा-आरती नित्यनेमाने चालू ठेवली आहे. नवरात्र उत्सवाची सुरुवात गुरुवारी घटस्थापना, पूजा अभिषेक करुन करण्यात आली.

मंदिरामध्ये रोज सकाळी आठला व सायंकाळी साडेसातला आरती करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी संपूर्ण मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून श्री अंबामाता मंदिर ट्रस्टच्या कामकाजाकरिता संस्थापक धनराज राठी, ट्रस्टी मगराज राठी, रविंद्र राठी, राजेश राठींसह संपूर्ण राठी परिवार व स्वयंसेवक व पोलीस यांच्यामार्फत सर्व कार्यक्रम भक्तिभावाने शिस्तबद्ध नियोजन पद्धती व शांतीपूर्वक साजरे करण्यात येतात.

हेही वाचा: डॉक्‍टर महिलेचा विनयभंग; महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक

यावर्षी कोरोना नियमांचे पालन करून व तसेच मशीनद्वारे तपासणी करून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्वयंसेवक व सिक्युरिटी गार्डची मोठ्या संख्येने नेमणूक केलेली आहे. तसेच सॅनिटायझेशन आणि मास्कशिवाय प्रवेश नाही. दरवर्षी खूप काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ट्रस्टने ठरविले असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले आहे.

loading image
go to top