
कुरकुंभ : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी हद्दीतील शितोळेवस्ती क्रमांक एक जवळ सोमवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्याच्या (preparing robbery) तयारी असलेल्या पाच आरोपींपैकी तीन दरोडेखोरांना सिनेमा स्टाईल (cinema style) पाठलाग करीत पकडण्यात दौंड पोलिसांना यश आले असून दोन आरोपी अंधार व ऊसाच्या शेताचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेले आरोपी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील असून त्यांच्याकडून तीन दुचाकी, तीन धारदार सत्तुर, एक गुप्ती, ग्रिल वायर व मिरची पाकीट जप्त करण्यात आले आहे. (three preparing robbery, were handcuffed by the police)
खडकी हद्दीतील शितोळेवस्ती क्रमांक एक येथील पुलाजवळ सोमवारी पहाटे काही अज्ञात व्यक्ती संशयीतरित्या वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळताच दौंडचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सहकाऱ्यांच्या पथकासह तातडीने खडकी येथे गेले. पोलिस पथक आल्याचा सुगावा लागताच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले पाचही आरोपी दुचाकी सोडून अंधार व बाजूच्या ऊसाच्या शेताचा फायदा घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिस निरीक्षक व पथकातील कर्मचाऱ्यांनी शिताफीने सापळा रचून दोन आरोपीना पाठलाग करून पकडले. तर एका आरोपीला ऊसाच्या शेतात उघडा सरीमध्ये झोपलेल्या अवस्थेत पकडले. मात्र दोन आरोपी अंधार व ऊसाच्या शेताचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
पकडलेल्या आरोपींकडून तीन दुचाकी दुचाकी, तीन धारदार सत्तुर, एक गुप्ती, ग्रिफ वायर व मिरची पूड इत्यादी दरोडयासाठी लागणारे साहित्य जप्त केले. दरोडा टाकण्याच्या तयारीतील गौरव भारत कुदळे ( रा. भोईरनगर आकुर्डी, पिपरी चिंचवड पुणे ), लहू उर्फ लाल्या अंकुश भिसे ( रा. पिंपरी चिंचवड पुणे ), महेश बाबूराव पाटील ( रा. दत्तनगर, थेरगाव, पिंपरी-चिंचवड पुणे ) या तीन आरोपींना अटक केली.
त्यांचे आणखी दोन साथीदार आरोपी फरारी झाले आहेत. दरोडय़ाच्या तयारीतील टोळीला पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक नारायण पवार,सहाय्यक उपनिरीक्षक मच्छिंद्र भगत, हवालदार पांडुरंग थोरात, अमोल गवळी, गोरख मलगुंडे, सतीश हिरवे, महेश भोसले, अमोल देवकाते, शैलेश हंडाळ स्थानिक पोलिस मित्र जहांगीर शेख, गोरख शितोळे, ज्ञानेश्वर शितोळे आदी ग्रामस्थांच्या पथकाने प्रयत्न केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.