पिरंगुट - राजीव गांधी इन्फोटेक मुळे मुळशीला मिळालेली आंतरराष्ट्रीय ओळख संपुष्टात आणू नका. त्यासाठी माण, हिंजवडी व परिसरातील काही गावे एकत्र करून वेगळी नगरपालिका करावी. परंतु हिंजवडी, माण व परिसरातील गावे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला जोडू नये, अशी मागणी मुळशी काँग्रेसने केली आहे.