samindratai sawant and milind sawant
sakal
- वेदिका आटोळे
पुणे - रासायनिक खते व संकरित बियाण्यांमुळे वाढलेल्या शेती उत्पादनाच्या खर्चामुळे आणि मातीच्या घटलेल्या सुपिकतेमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना बारामती तालुक्यातील सावंतवाडी येथील शेतकरी मिलिंद सावंत आणि त्यांची आई समिंद्राताई यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग निवडला आहे. देशी बियाण्यांचे जतन व संवर्धन करत त्यांनी शेतीतून चव, आरोग्य आणि परंपरेचे जतन केले आहे.