Shankarrao Gholap
sakal
घोडेगाव (ता. आंबेगाव) - येथील जनता विद्या मंदिर या शाळेचे माजी मुख्याध्यापक व संस्थेचे माजी सचिव, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले शंकरराव रामचंद्र घोलप यांचे (वय-९१) पुणे बाणेर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.