draupadi murmu
sakal
पुणे - राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना विचारले, तुम्हाला भविष्यामध्ये काय बनायचे आहे? कुणी सांगितले डॉक्टर, वैमानिक, लष्कार, पोलिसमध्ये जाणार असल्याची उत्तरे दिली. पण, राष्ट्रपती भवनमध्ये उपस्थित असलेल्या भोरमधील आपटी जिल्हा परिषदेच्या शाळेतील सोहम पारठे या सहावीतील विद्यार्थ्याने ‘मला राष्ट्रपती व्हायचंय,’ असे उत्तर दिले.