
पुणे : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत शिवकालीन १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. जुलै २०२४ मध्ये दिल्लीतील भारत मंडपम येथे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या दहा दिवस चाललेल्या अधिवेशनात या १२ किल्ल्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.