rachna padir
sakal
आळेफाटा - वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील पादिरवाडीतील शेतकरी कन्या रचना भाऊसाहेब पादिर हिची मिरा-भाईंदर पोलिस दलात निवड झाली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याने संपूर्ण पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.