मंदिर, अर्चक व पुरोहितांच्या संघटनात्मक बळकटीवर भर

मंदिर, अर्चक व पुरोहितांच्या संघटनात्मक बळकटीवर भर
Published on

मंदिर, अर्चक व पुरोहितांच्या संघटनात्मक बळकटीवर भर
विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनात शासनाचे कायदे, मंदिर व्यवस्थापन आणि हिंदू समाजापुढील आव्हानांवर मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक-पुरोहित संपर्क विभागातर्फे आयोजित स्वामी, ब्राह्मण, गुरव, पंतलू व पुजारी संमेलनात मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी अर्चक व पुरोहितांनी संघटित होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मंदिरांसमोरील आव्हाने, शासनाचे कायदे आणि हिंदू समाजाची भूमिका यावर मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.१५ वाजता दीपप्रज्वलनाने झाली. बाबू गिरगल यांनी परिपाठी सादर केली, तर संजयकुमार जमादार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. विजयकुमार पिसे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. जिल्हाध्यक्ष विष्णूजी मोंढे पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
धनाजी शिंदे यांनी मंदिर अर्चक व पुरोहितांच्या एकत्रीकरणाची आवश्यकता विशद करत संघटनात्मक बळकटीवर भर दिला. विष्णूजी मोंढे पाटील यांनी मंदिर व्यवस्थापनात समाजाचा सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. मनोज हिरेहब्बू यांनी मंदिरे व पुरोहितांसमोरील सध्याच्या आव्हानांचा ऊहापोह केला. अपर्णाताई कल्याणी यांनी शासनाचे कायदे आणि हिंदू समाज या विषयावर मार्गदर्शन केले, तर मोहन दाते यांनी उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले. गजानन धरणे यांनी मंदिरे, अर्चक, पुरोहित आणि हिंदू संघटनांमधील समन्वयाची आवश्यकता अधोरेखित केली. श्रीकंठ शिवाचार्य महाराज यांनी आशीर्वचनातून धर्म, संस्कृती व सामाजिक समरसतेचा संदेश दिला. केदार पाटील यांनी आभार मानले, तर बसवेश्वर सोलापूरे यांनी पसायदान सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे यांनी केले.
संमेलनाच्या आयोजनासाठी मंदिर अर्चक-पुरोहित संपर्क विभागाचे जिल्हाप्रमुख सिद्धेश्वर गोकावी, समरसता प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी, बजरंग दल जिल्हा संयोजक अभय कुलथे तसेच अमित सारोळकर, अक्षय कनकोन्डला, किसन दावत, राजशेखर पाटील, संजीव मळेकर, संजीव चिप्पा, बालाजी रजपूत, मधुकर राबेली, रवींद्र येदूर, माधुरी एकबोटे, ऐश्वर्या सारोळकर, कल्पना जगदाळे, अजय सूर्यवंशी, बासूदकर आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com