दीड हजार बेघरांना हक्काचे घर

चऱ्होली - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोतवाल वस्तीत उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाची प्रतिकृती.
चऱ्होली - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोतवाल वस्तीत उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाची प्रतिकृती.

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी पाच ठिकाणी गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातील चऱ्होली-कोतवालवस्ती येथे प्रस्तावित १४४२ सदनिकांच्या प्रकल्पाला मुहूर्त मिळाला असून, त्याची वर्कऑर्डर काढली आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांच्या निविदाप्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला होता. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रस्तावित गृहप्रकल्प चर्चेत आले होते. महापालिका प्रशासनाला फेरनिविदा काढाव्या लागल्या होत्या. त्यातील चऱ्होलीतील प्रकल्पाला आता मुहूर्त लागला आहे. त्याचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) झाले.  

कोतवाल वस्तीतील गृहप्रकल्प नव्याने विकसित केल्या जात असलेल्या चऱ्होली-लोहगाव रस्त्यालगत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात एकूण सात इमारती बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक इमारत १४ मजल्यांची असेल. अधिकच्या चिन्हासारखी इमारतींची रचना असेल. कोणत्याही सदनिकेच्या खिडक्‍या एकमेकांच्या समोर येणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. प्रत्येक मजल्यावर १६ सदनिका असतील. एका सदनिकेसाठी अंदाजे नऊ लाख १९ हजार रुपये खर्च येणार असून, प्रकल्पाचा एकूण खर्च १३२ कोटी ५० लाख रुपये अपेक्षित आहे. प्रत्येक इमारतीला लिफ्टची सुविधा असेल.

चऱ्होलीतील गृहप्रकल्पाची वर्कऑर्डर ठेकेदाराला दिली आहे. लवकरच बांधकामाला सुरवात होईल. बांधकाम पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी दिला आहे. 
- प्रदीप पुजारी, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका

चऱ्होली गृहप्रकल्पाविषयी
एकूण क्षेत्रफळ २१,५०० चौरस मीटर
एकूण बांधकाम ९७ ,२२६ चौरस मीटर
मोकळी जागा २,१५८ चौरस मीटर 
ॲमिनिटी स्पेस ८८६ चौरस मीटर 
प्रतिसदनिका बांधकाम ३७८ चौरस फूट
कार्पेट एरिया ३२२ चौरस फूट
सदनिकेची रचना - लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम, बाल्कनी, टॉयलेट, बाथरूम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com