
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. ६) मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर येणार असताना महामेट्रो आणि महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे.
पंतप्रधान मोदी आज पुण्यात
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (ता. ६) मेट्रोसह (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) येणार असताना महामेट्रो (Mahametro) आणि महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेची निवडणूक (Municipal Election) पुढील काही महिन्यात होणार असल्याने भाजपने (BJP) यानिमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन (Power Presentation) करण्याची जोरदार तयारी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भाजपने महापालिकेत वेगात हालचाली करत नदी सुधार प्रकल्प (जायका) आणि नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या सुमारे २५०० कोटींची कामे मंजूर केली. या प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी, ई बस व ई बस चार्जिंग स्टेशनचेही लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेत बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करून मोदींच्या पुणे दौऱ्यांची खऱ्याअर्थाने सुरवात होईल.
हेही वाचा: शरद पवारांनी वारज्यातील जुन्या आठवणींना दिला उजाळा
असा असेल दौरा
लोहगाव विमानतळावर १०.१५ वाजता आगमन
विमानतळावरून सिंचननगरपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास
सिंचननगर येथून कारने निघून १०.४५ ला पुणे महापालिकेत आगमन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
११.१० ला महापालिकेतून निघून गरवारे मेट्रो स्टेशनकडे रवाना
११.३५ पर्यंत मेट्रोचे उद्घाटन करून मेट्रोने आनंदनगर स्टेशनपर्यंत प्रवास करणार
११.४० ला आनंदनगर येथून एमआयटीच्या मैदानाकडे रवाना
१२ ते १ एमआयटी येथील कार्यक्रमासाठी उपस्थित (या कार्यक्रमासाठी नागरिकांनी दोन तास आधी उपस्थित राहावे)
१.४५ वाजता लवळे येथील सिंबायोसिस येथील कार्यक्रमाला उपस्थिती
२.३० वाजता विमानतळाकडे रवाना
Web Title: Prime Minister Nerendra Modi Today In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..