
पुणे : ‘‘तुमचे काम कितीही व्यग्र असो, दिवसातील किमान एक तास स्वतःसाठी द्या. ते शक्य नसेल, तर तुमच्या वेळेचे नियोजनच चुकीचे आहे. आपला प्राधान्यक्रम ठरवून वेळेचे योग्य नियोजन केल्यास व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध आणि शिस्तबद्ध होते,’’ असे मत ‘सकाळ’ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मांडले.