पुणे : येरवडा कारागृहातून एका कैद्याचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

संजय रामजीत भुईया (वय 36, रा.सिधारी, झारखंड) असे पलायन करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा करागृह प्रशासनाचे अधिकारी हेमंत पाटील (वय 42, रा.चंदननगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : येरवडा कारागृहाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदुन शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने शनिवारी पलायन केले. ही घटना शनिवारी दुपारी साडे चार ते रात्री साडे आठ या वेळेत येरवडा खुले कारागृहामध्ये घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संजय रामजीत भुईया (वय 36, रा.सिधारी, झारखंड) असे पलायन करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा करागृह प्रशासनाचे अधिकारी हेमंत पाटील (वय 42, रा.चंदननगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुईया हा एका गुन्हामध्ये उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी सप्टेंबर 2019 मध्ये येरवडा कारागृहामध्ये दाखल झाला होता.

दरम्यान, सायंकाळी पावणे सहा वाजता सर्व कैद्याची गणती केली जात होती. त्यावेळी भूईया हा तेथे आढळला नाही. इतर कैद्याकडे चौकशी केल्यानंतर तो दुपारी साडे चार वाजल्यापासून दिसला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खुले कारागृह, शेती परीसर, संपूर्ण तट, जंगल परीसर व आजुबाजूच्या वस्तीमध्ये शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. कैदी कारागृहात नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prisoner escapes from Yerawada jail in Pune