..त्यापेक्षा विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा- पृथ्वीराज चव्हाण | Vikram Gokhale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan and Vikram Gokhale

..त्यापेक्षा विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा- पृथ्वीराज चव्हाण

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Vikram Gokhale यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले यांनी विविध घडामोडींवर आपली परखड मतं मांडली. शिवसेना-भाजपने पुन्हा एकत्र यावं असंदेखील ते म्हणाले. यावर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी प्रतिक्रिया दिली. "विक्रम गोखले यांनी राजकीय गोष्टींवर काही बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करावा. निवडणुकीला उभं राहून लोकांची मतं घ्यावी. ते स्वत: मुख्यमंत्री झाले, तर याचा मलाही आनंद होईल", असं ते म्हणाले.

शिवसेना-भाजपविषयी विक्रम गोखले काय म्हणाले?

"शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यायला हवं. ज्या कारणाने बाळासाहेब यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. हे गणित चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. मतपेट्यांचं राजकारण करणारे यांच्यामुळे हिंदू मुस्लिम, ब्राह्मण दलित यांत वाद होतील. शिवसेना-भाजप एकत्र येण्याबाबत मी पुढाकार घेतला आणि घेईन. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो, तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं," असं विक्रम गोखले म्हणाले.

हेही वाचा: 'कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो'; विक्रम गोखले

विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना रणौतच्या स्वातंत्र्याच्या विधानाचं समर्थन केलं. "कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी तिच्या वक्तव्याचं समर्थन करतो. आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, हे चुकीचं आहे."

loading image
go to top