
पुणे : ‘‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शिमला करारात अनेक महत्त्वाचे कलमे आहेत. त्यामध्ये समस्या कितीही जटील असली तरी द्विपक्षीय चर्चा करून त्यावर तोडगा काढू, त्यामध्ये तिसऱ्याची मध्यस्थी चालणार नाही, हे महत्त्वाचे कलम आहे. मात्र, कालच्या प्रकारावरून केंद्र सरकारने शिमला करारात काही बदल केला आहे का? हे केंद्र सरकारने विश्वासात घेऊन सांगितले पाहिजे,’’ असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तसेच पक्षांतर बंदी कायदा रद्द केली पाहिजे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.