पुण्यात खासगी क्‍लास होणार सुरु; पुणे महापालिकेने दिली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्‍यतेने शिकवण्या सुरू करण्यास महापालिकेने नकार दिला होता. मात्र, या टप्प्यातही संसर्ग वाढण्याची चिन्हे नसल्याने खासगी शिकवणीचे वर्ग सुरू करता येणार आहेत. शहर आणि उपनगरातील शिकवणीचे वर्ग सुरू करण्यास सशर्त परवानगी असल्याचे महापालिकेच्या आदेशात म्हटले आहे.

पुणे : शहरातील खासगी शिकवणी (क्‍लासेस) सुरू करण्यास महापालिकेने सोमवारी परवानगी दिली असून, हे वर्ग भरविताना सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य देण्याबाबत शिकवणी व्यवस्थापनाला बजावले आहे. वर्गात गर्दी झाल्यास आणि विद्यार्थी, शिक्षकांच्या सुरक्षिततेकडे काणाडोळा केल्यास कारवाई होणार आहे.

डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्‍यतेने शिकवण्या सुरू करण्यास महापालिकेने नकार दिला होता. मात्र, या टप्प्यातही संसर्ग वाढण्याची चिन्हे नसल्याने खासगी शिकवणीचे वर्ग सुरू करता येणार आहेत. शहर आणि उपनगरातील शिकवणीचे वर्ग सुरू करण्यास सशर्त परवानगी असल्याचे महापालिकेच्या आदेशात म्हटले आहे.

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार 

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या की, खासगी शिकवणीच्या वर्गाबाहेर सॅनिटायझर ठेवणे आणि विद्यार्थ्यांनी मास्क लावणे अनिवार्य आहे. वर्गाचे वारंवार निर्जंतुकीकरण केले पाहिजे. याबाबत टाळाटाळ करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private classes allowed in Pune

Tags
टॉपिकस
Topic Tags: