पुणे : खासगी रुग्णालयाने कोरोनाच्या उपचारासाठी मदत करावी; दिलीप वळसे-पाटील यांचे आवाहन

पुणे : खासगी रुग्णालयाने कोरोनाच्या उपचारासाठी मदत करावी; दिलीप वळसे-पाटील यांचे आवाहन
Updated on

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यात नागरिक काळजी घेत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टर, परिचारिका, उपकरणे, औषधे रुग्णांसाठी जेवण, नाश्ता आदी सुविधांसह दोन हजार बेड्स तयार केले तरच भविष्यात कोरोनासाठी तालुक्यात उपचार पद्धती चालू होईल. खासगी डॉक्टर व खासगी रुग्णालयानेही कोरोनाच्या उपचारासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

पारगाव (ता. आंबेगाव ) दत्तात्रेय नगर येथे शिरूर तालुक्यातील कोविड १९ आढावा बैठकीत वळसे-पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, तहसीलदार लैला शेख, माजी आमदार पोपटराव गावडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी आर. डी. शिंदे, पोलिस निरीक्षक सुरेश राऊत, मानसिंग पाचुंदकर, राजेंद्र गावडे, प्रमोद पऱ्हाड, सविता बगाटे उपस्थितीत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वळसे पाटील म्हणाले, शिरूरमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाने रूग्ण संख्या वाढत आहे. पण त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून मलठण येथे प्रस्तावित ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात यावे. यासाठी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत निर्णय होऊन देखील कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये आरोग्य विभागाबाबत चुकीचा संदेश जात आहे. 39 गावाशी संबधित 3 जिल्हा परिषद गटामध्ये 3 अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियूक्ती करावी. तालुक्यामध्ये 50 ऑक्सिजन बेड्स तयार करण्यात यावे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आरोग्य विभाग, महसूल व पोलिस यंत्रणेला याबाबत सहकार्य करून नागरिकांना कोरोनामध्ये लढण्याचे बळ द्यावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रांजणगाव औद्यागिक वसाहतीमध्ये पुणे येथून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेने योग्य काळजी घेऊन संबंधितांवर सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर न केल्याबद्दल कारवाई करावी. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात शिरूरची 39 गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. नागरिक कोणतीही काळजी न घेता कामाव्यतिरिक्त फिरत आहे. पुढील 16 महिने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असून, शासनाने दिलेल्या नियमानुसार वागा, नाहीतर भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. प्रशासनाला साथ द्या, असे आवाहन वळसे-पाटील यांनी यावेळी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com