Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

खासगी शाळांकडून शुल्क परत न मिळाल्याने होणाऱ्या पालकांच्या आर्थिक फटक्याची दखल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीला ३० दिवसांत धोरणाचा अहवाल सादर करण्याची मुदत
Impact of 'Sakal' News: Education Commissioner Acts Against Financial Exploitation

Impact of 'Sakal' News: Education Commissioner Acts Against Financial Exploitation

Sakal

Updated on

पुणे : एखाद्या शाळेत प्रवेश घेतला आणि तो रद्द केल्यास संबंधित शाळांकडून शुल्क परत मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी पालकांना मोठा आर्थिक फटका बसतो. हे लक्षात घेऊन राज्यात लवकरच शुल्क परतावा धोरण येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यादृष्टीने शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पाऊल उचलत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. हे धोरण ठरविण्यासाठी शिफारशी देण्यासाठी समितीला तीस दिवस देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com