esakal | आता खासगी रेल्वेही धावणार; महाराष्ट्रातील 'या' मार्गांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

आता खासगी रेल्वेही धावणार; महाराष्ट्रातील 'या' मार्गांचा समावेश

-  मुंबईहून 23 तर पुण्यातून 6 मार्गांवर धावणार खासगी रेल्वे

आता खासगी रेल्वेही धावणार; महाराष्ट्रातील 'या' मार्गांचा समावेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : देशातील ज्या 109 रेल्वे मार्गांचे खासगीकरण करायचे आहे, त्यात मुंबईहून वाहतूक करणाऱ्या 23 तर पुण्याहून सुटणाऱ्या 6 मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातंर्गत 5 मार्गांचा त्यात समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रेल्वेने देशातील 109 मार्गांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत. या मार्गांत सर्वाधिक मुंबईतील मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वेच्या मार्गांमध्ये मुंबईचे स्थान अधोरेखित झाले आहे. पुणे- रेल्वे प्रवास तीन तासांचा असल्यामुळे त्याचा या निविदेत समावेश नाही. परंतु मुंबई- दिल्ली, मुंबई- अहमदाबाद आदी मार्गांचा समावेश आहे. तसेच कायम गर्दी असणाऱया मुंबई- पाटना, मुंबई- दरभंगा, पुणे- दरभंगा, पुणे- पाटना या मार्गांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या या मार्गांवर धावणार खासगी रेल्वेगाड्या - दरभंगा, पाटना, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, इंदूर, सिकंदराबाद, चेन्नई, हावडा, प्रयागराज, गोरखपूर, झांशी, कानपूर, कलबुर्गी, जयपूर, भोपाळ. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याहून या मार्गांवर धावणार खासगी गाड्या - दिल्ली, पाटना, हावडा, प्रयागराज, दिब्रूगड, भोपाळ, 

- महाराष्ट्रातंर्गत या मार्गांवर धावणार खासगी गाड्या - मुंबई- नागपूर, मुंबई- शिर्डी, मुंबई- अकोला, मुंबई- नंदुरबार, मुंबई - औरंगाबाद 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रवाशांना मिळणार हे फायदे...

- एक तास उशीर झाल्यास प्रवाशाला 100 रुपये मिळणार 
- रेल्वे गाडीच्या डब्याच्या आसन क्षमतेइतकेच तिकिटे दिली जाणार 
- अॅटेंडंट विमानाच्या धर्तीवर सेवा देणार 
- पिण्याचे पाणी प्रत्येक डब्यात मिळणार 
- फर्स्ट एड किट
- स्वच्छ पडदे, बेडशीट व उशी
- माफक दरात केटरींगची सुविधा  
- प्रत्येक डब्यात सुरक्षा रक्षक नियुक्त 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image