खासगी ट्यूशनला शाळेचे नियम लागू करावेत; "सिस्कॉम'ची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

15 दिवसापेक्षा जास्त दिवस चालणारे क्‍लास, खासगी ट्यूशन यांना शाळांचे नियम लागू करावेत यासह इतर सुधारणावादी मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे, असे "सिस्कॉम'च्या संचालिका वैशाली बाफना यांनी सांगितले.

पुणे - "सिस्कॉम'ने "शैक्षणिक धोरणात सुधारणा-प्रगती दिशा' हा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता. त्यातील राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करणे, पूर्व प्राथमिक शिक्षणाला सर्व नियम लागू करणे अशा सूचनांचा समावेश नव्या शैक्षणिक धोरणात केला आहे. तर 15 दिवसापेक्षा जास्त दिवस चालणारे क्‍लास, खासगी ट्यूशन यांना शाळांचे नियम लागू करावेत यासह इतर सुधारणावादी मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे, असे "सिस्कॉम'च्या संचालिका वैशाली बाफना यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करावी, संपूर्ण देशासाठीच किमान अभ्यासक्रम एनसीपीअसीआर तयार करणार असल्याने सर्व भाषेत पुस्तके तयार केली जातील, पूर्वप्राथमिक शाळेला शिक्षणाचे सर्व कायदे लागू करणे, पुस्तकी ज्ञानावर व गुणांवर आधारित शिक्षण पद्धती बंद करून थेट कामाचा अनुभवावरून मूल्यांकन, भारतीय भाषा, कला, संस्कृती जोपासण्यास व विद्यार्थ्यांच्या कला गुणांनावाव देणारी व्यवस्था निर्माण करणे, शासकीय शाळा व खासगी शाळांसाठी एकसमान कामकामकाज पद्धती लागू करणे या "सिस्कॉम'च्या सूचनांचा धोरणात विचार केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिजिटल इंडिया साठी डिजिटल शिक्षण व्यवस्था उभारवी, शाळांचे लेखापरीक्षण करताना आर्थिक व्यवहार तपासणीसह शाळेचे वातावरण, इमारतीची परिस्थिती, सुरक्षाव्यवस्था ही तपासावी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये यासाठी शिक्षण आचार संहिता तयार करावी, 15 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे क्‍लासेसला, शिकवणी, ट्यूशन, प्रशिक्षण, कौशल्य शिकविणारी, शिक्षण देणारी संस्था, व्यक्तींची उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक करून शाळा महाविद्यालयांसाठी असणारे सर्व नियम लागू करावे यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता देताना त्याभागातील धार्मिक, भाषिक अल्पसंख्याक लोकसंख्या विचारात घ्यावी यासह आदी विषयांचा पाठपुरावा सुरू केंद्राकडे सुरू आहे, असे बाफना यांनी सांगितले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private tuition should apply school rules Siscom demand

Tags
टॉपिकस
Topic Tags: