‘सकाळ साप्ताहिक’च्या दिवाळी अंकाला पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पिंपरी-चिंचवडमधील कविवर्य नारायण सुर्वे साहित्य, कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘सकाळ साप्ताहिक’च्या दिवाळी अंकाला मुख्य विभागाअंतर्गत द्वितीय पुरस्कार मिळाला.

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील कविवर्य नारायण सुर्वे साहित्य, कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत ‘सकाळ साप्ताहिक’च्या दिवाळी अंकाला मुख्य विभागाअंतर्गत द्वितीय पुरस्कार मिळाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुख्य विभागाअंतर्गत प्रथम ‘ऋतुरंग’, द्वितीय ‘सकाळ साप्ताहिक’ आणि ‘शब्दमल्हार’; तर तृतीय क्रमांक ‘पुण्यनगरी’, ‘साहित्यस्वानंद’ आणि ‘अधोरेखित’ या अंकांना मिळाला आहे. या स्पर्धेत विशेष पुरस्कार, बालसाहित्य, औद्योगिक, आरोग्य, प्रवास, कथासंग्रह, सांस्कृतिक, ग्रामीण विभाग आणि मुख्य विभाग अशा विविध विभागांतर्गत पुरस्कार जाहीर करण्यात आले. ‘सकाळ साप्ताहिक’ने वेगळेपण जपत वाचकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. चौफेर विषय घेऊन वाचकांची आवड जपली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prize for Diwali issue of sakal saptahik